तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

"दुसऱ्यांची रेष पुसण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही तर स्वतःची रेष मोठी करण्यात आम्हाला आनंद आहे - अध्यक्ष अमेय खोपकर



जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची अधिकृत घोषणा झूम मिटिंगद्वारे करण्यात आली. ह्या वेळी अनेक  नाट्यकलावंत उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा ह्यावेळी करण्यात आली. नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय आणखी सुरळीत सुरू होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली. लवकरच ह्या निर्माता संघाचा दृष्टिकोन आणि कार्यक्रम कळेल असं प्रवक्ते श्री. अनंत पणशीकर ह्यांनी सांगितले.
जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर रंगभूमीवरील सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी विचार करेल , अशी नाट्य रंगकर्मींची अपेक्षा आहे.  सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने ह्या निर्माता संघाने कार्य केले तर भविष्यात निश्चितच बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबई, पुण्यात, नाटक करताना येणारे अडथळे दूर होऊ शकतील.
अध्यक्ष अमेय खोपकर ,
उपाध्यक्ष महेश मांजरेकर  कार्यवाहदिलीप जाधव
सह कार्यवाह श्रीपाद पद्माकर, खजिनदार चंद्रकांत लोकरे
प्रवक्ता अनंत पणशीकर सदस्य सुनील बर्वे 
नंदू कदम
कायदा सल्लागार  हर्षद भडभडे ,मार्गदर्शक लता नार्वेकर ,प्रशांत दामले अशी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे.दुसऱ्यांची रेष पुसण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही तर स्वतःची रेष मोठी करण्यात आम्हाला आनंद आहे असं सकारात्मक प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमेय खोपकर ह्यांनी ह्या प्रसंगी केले.  नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी आणि रंगकर्मींनी सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले आणि मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment