तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

बीड शहर आठ दिवसांसाठी कडेकोट बंद; संचारबंदी लागू


बीड (प्रतिनिधी) :- बुधवारी  तीन रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णाने शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतल्याने पुढे आले आहे. या रूग्णालयाच्या माध्यमातून बहुसंख्य लोकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क आल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढू नये त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी (दि.1) रात्री उशिरा आगामी सात दिवसासाठी (9 जुलै रात्री 12 वा.) पर्यंत बीड शहर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे बीडमधील सर्व व्यवहार पुन्हा बंद राहणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवारी बीड शहरात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. बीड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण शहरामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यान्वीत केली आहे. त्यानुसार आता 9 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बीड शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमविषयक सेवा 24 तास सुरु राहतील. या कालावधीत बीड शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही. शहराबाहेरही जाता येणार नाही. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळून (महसूल, पोलीस, ग्रामविकास, नगरविकास, कृषी व आरोेग्य) बीड शहरातील सर्व आस्थापना, बँका (शासकीय व खासगी आस्थापना इ.) बंद राहतील. वरिल सहा विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे शहरातंर्गत प्रवास करु शकतील. बीड शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी आता ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही परंतु मेडिकल इमरजन्सीमधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज कोव्हीड 19 एमएचपोलीस डॉट कॉम या संकेतस्थळावर भरुन पास प्राप्त करुन घेता येईल. 
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार बीडमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक आहे. बीड शहरात फक्त फिरते दूध विक्रेत्यांना परवानगी राहिल. कोणत्याही दुकानदारामार्फत दूध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दूध पाकीटांची होम डिलेव्हरी करावी. व ती करताना सामाजिक अंतर राखावे. परवानाधारक भाजी व फळ विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणे परवानगी राहिल परंतू त्यांना घरोघरी जावून विक्री करावी लागणार आहे.घरगुती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा. गणवेश नसलेल्या कर्मचार्‍यांनी नियमानुसार पास काढून सेवा घ्यावी. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचार्‍यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेत्यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पासव्दारे बीड शहरातंर्गत प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a comment