तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा जिल्हा वाशिम च्या वतीने कारंजा शहरातील कोरोना योद्धांचा सन्मान


कारंजा(फुलचंद भगत): कोरोनाचे काळात अापल्या कुटुबांची व जिवाची पर्वा न करता ज्या अधिकारी ,कर्मचारी यांनी कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी  कार्य केले असे मा. तहसिलदार धिरज मांजरे नायब तहसिलदार विनोद हरणे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिश पाटील  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील व नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर अारोग्य निरिक्षक विनय वानखडे वत्यांचे सहकारी कारंजा शहरातील डॉक्टर अजय कांत डॉ. प्रदीप धोपे, डॉ. राम गुंजाटे, डॉ. रश्मी गुंजाटे डॉ. नवल सारडा, डाॅ. यशवंत टेकाडे डॉ. उत्तम तपासे, डॉ. शंकर नांदे डॉ. किरण जाधव डॉ.अाशिफ अाकबानी तसेच कोरोनाचे काळात गरीबाना अन्न धान्य व जेवन देणारे मा. अामदार प्रकाश दादा डहाके  ललीत चांडक शेषराव ढोके न. प. अध्यक्ष युसुफ सेठ पुंजानी गुरुमंदीर संस्थान ध्यास संस्था जिजाउ बचत गट महेश चौधरी रवि घाटे या कोरोना योद्धाना महाराष्ट्र राज्य  मराठी पञकार संघ वाशीम शाखा कारंजा तर्फे वाशीम जिल्हा अध्यक्ष सुनील फुलारी कारंजा तालुका अध्यक्ष कीरण क्षार उपाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे  सचिव रामदास मिसाळ विलास राउत चाँदभाई मुन्नीवाले प्रकाश अाडे यांचे हस्ते सन्मान पञ देउन गौवरण्यात अाले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment