तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 5 July 2020

सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथील आंब्याच्या झाडाला या दिवसात पण आंबे आंब्यांनि झाड चक्क वाकून गेले आहें






हिंगोली प्रतिनिधी

 राज्यात वर्षातून एक वेळेस किंवा एक वर्ष येणारे आंब्याचे विविध प्रजाती आहेत. मात्र वर्षातून दोन वेळा फळ देणारे गावरानी आंब्याच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. अशीच एक आंब्याची दुर्मिळ प्रजात हिंगोली च्या सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथील शेतकरी संतोष पोपळघट यांच्या शेतामध्ये बघायला मिळते. वीस वर्षांपूर्वी लावलेल आंब्याचे झाड वर्षातून दोनदा गावरान आंब्याचा गोडवा देऊ लागल्याने कुतूहलाचा विषय ठरला आहे. झाड पाहण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी सध्या पोपळघट यांच्या शेतामध्ये येतात. कृषी विद्यापीठाने यावर अभ्यास  व संशोधन करून कलमीकरण कराव जेणेकरून गावरान आंब्याचा हरवत चाललेला गोडवा सर्वांना  चाखायला मिळेल, फळाने आंब्याचे झाड सध्या वाकून पडले आहे.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment