तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

डोणगांव प्रा. आ. केंद्राअंतर्गत ११ पाँझिटिव्ह


 डोणगांव.:- २४ (जमील पठाण ) 

डोणगांव प्रा. आ. केंद्राअंतर्गत येणाऱ्या अंजनी बु येथे २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे तर लोणी गवळी येथे ८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे तर डोणगाव येथे १ पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून अशाप्रकारे डोणगांव प्रा. आ. केंद्राअंतर्गत एकूण ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे तर लोणीगवळी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15जणांना क्वारंटाईन करून स्वॅब घेण्यासाठी कोविड सेन्टर येथे पाठविण्यात आले आहे तर डोणगाव येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 3जणांना क्वारंटाईन करून स्वॅब घेण्यासाठी कोविड सेन्टर येथे पाठविण्यात आले आहे असे एकूण २२ जणांना स्वॅब साठी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गवई यांनी सांगितले.

  लोणीगवळी येथे कोविड आरोग्य शिबीर.  

          लोणीगवळी येथे एकाच दिवशी तब्बल 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाच्या वतीने दि. 25जूलैला लोणीगवळी येथील संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गवई यांनी केले आहे.

No comments:

Post a comment