तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

शासकीय अधिकाऱ्यांसाठी सरकारचा नवा जीआरसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २२ _ महाविकासआघाडी सरकार हे आता भाजपच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये जणू असाच जीआर राज्य सरकारने काढला आहे. दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्याना ही उपस्थिती राहतील असे आता नवीन निघालेल्या जीआर वरुन वाटत नाही.
     आमचे गेवराई येथील विशेष प्रतिनिधी सुभाष मुळे यांना प्राप्त झालेल्या जीआर मध्ये म्हणटले आहे की,  भाजप सरकारने ११ मार्च २०१६ रोजी अशाच पद्धतीचे परिपत्रक जारी करून शासकीय अधिकाऱ्यांनी विरोध पक्ष नेत्यांच्या बैठकांना हजर राहू नये अशा सूचना केल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील परिपत्रकाच्या आधारे आज हा जीआर जारी केला आहे. आमदार किंवा खासदार यांनी आयोजित केलेल्या बैठकानाही शासकीय अधिकाऱ्यांनी हजर राहू नये जणू असाच जीआर आहे..! त्याऐवजी आमदार, खासदार यांच्या प्रलंबित कामाची यादी जिल्हाधिकारी यांनी मागवून घ्यावी. महिन्यातील एक दिवस निश्चित करून संबंधित लोकप्रतिनिंधींबरोबर बैठक आयोजित करावी असं या जीआर मध्ये म्हटलं आहे.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment