तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 July 2020

"ज्ञान-मंथन" या डिजिटल ई-मासिकाचे शाहू भारती यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन...!
"ज्ञान-मंथन" या डिजिटल ई-मासिकाच्या तिसऱ्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन रयतेचा वाली या शैक्षणिक दैनिकाचे संपादक श्री.शाहू संभाजी भारती यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मानसिकता लक्षात घेऊन या मासिकाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी हा हेतू समोर ठेऊन "ज्ञान-मंथन" हे मासिक प्रकाशित करण्यात येत असल्याचे मासिकाचे संपादक गणेश सोळुंके यांनी सांगितले.
या मासिकामध्ये चालू घडामोडीवर विचार करणारे दृष्टिक्षेप हे सदर असून त्यासोबत काव्यविभाग, संस्काराची शिदोरी, शिक्षक-विद्यार्थी-पालक भूमिका, शाळेतल्या गंमती-जमती, भटकंती, ज्ञान-विज्ञान, ज्ञान-तंत्रज्ञान, मिळवा प्रयोगातून ज्ञान, आजीच्या गोष्टी, किड्स कॉर्नर, बोलके चित्र, चित्र रंगवा, गंमत-जम्मत, माझी शाळा-माझा उपक्रम यासारख्या विविध सदरांचा समावेश असल्याने हे मासिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस पडत आहे.
या मासिकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रसिद्ध स्तंभलेखक नासा येवतीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिद्ध व्याख्याते तथा लेखक लक्ष्मीकांत कोलते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर लेख लिहिला आहे. त्याचबरोबर या मासिकामध्ये सचिन बेंडभर, महादेव खळूरे, सौ.भारती तिडके, सौ.भारती सावंत, सौ.वैशाली लोंढे, निलम गायकवाड, सौ.गीता शेलार, प्रा.त्रिशिला साळवे, शीला आंभुरे बिनगे, रुखसाना शेख, माधवी बुधे, अर्चना तुळजापुरे, सौ.जयश्री सिरसाठे, सौ.रेणुका तिळकरी, स्मिता मुराळी, प्रमिलताई सेनकुडे, डॉ.ज्योती सहाणे, कु.अदिती मोरे, अशोक कुमावत, विजय माने, चक्रधर तांबट, वाईनवाड गुणवंत, प्रतीक उकले, प्रा.भगवान पांडे, विकास बोर्डे, अमोल भागवत, मंगेश घोलप, कैलास मोरे, शंकर चौरे आदी मान्यवरांचे लेख व कविता आहेत.
या मासिकासाठी उपसंपादक आयुब शेख, सुंदरसिंग साबळे, चेतन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
मासिकासाठी रत्ना हिले, अरविंद शिंगाडे, धनंजय गुडसुरकर, नागेश पांडे, राजेंद्र शेळके, शिरीष देशमुख, श्वेता अंबाडकर, स्नेहलता कुलथे, विनायक काकूळते आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment