तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

विदर्भात अकोला जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस; चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद


अकोला : 29 (जमील पठाण ) 

सुरुवातीपासून कमी-जास्त प्रमाणात असलेल्या पावसाने आता जोर धरला आहे. सद्यस्थितीत विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३१९.२ मि.मी पावसाची नोंद झाली असून, अमरावती विभागात २३२.७ मि. मी. पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वात कमी १८८.५ मि.मी पाऊस झाला. येत्या काही दिवस जोरदार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

वरुणराजाची कृपा झाल्यावर बळीराजा शेतीची मशागत करून पेरणीला सुरुवात करीत असतो. परंतु गेल्या वर्षी जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटूनही वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा कमालीचा चिंतित झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्या परिस्थितीतून सावरत थोडी तजविज करून यंदा बळीराजाने पेरणी केली, त्यात मॉन्सूनही वेळेवर दाखल झाला. मात्र, विदर्भातील काही भागात कोरडवाहू शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळाला. आतापर्यंत अमरावती विभागात २३२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तर अकोला जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यातही कमी पाऊस नोंदविला गेला.

पीक-पाणी चांगले; रोगराई सुचू देईना
यावर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने पिकेही चांगली बहरली आहे. मात्र, पर्जन्यमानातील बदलांमुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

--जिल्हानिहाय पावसाची नोंद-- 
जिल्हा झालेला पाऊस (मि.मी) 
बुलडाणा १८८.९
अकोला १८८.५ 
वाशीम २५१.१ 
अमरावती २६२.७ 
यवतमाळ २५८.५ 
वर्धा २४९.७ 
नागपूर २४३.६
भंडारा २२५.१
गोंदिया २४९.४ 
चंद्रपूर ३१९.२
गडचिरोली २५८.०

No comments:

Post a comment