तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

" ये मेरा दिवानापन डिजिटल संगीत मैफल "


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे .हार्मोनी हार्टस् आणि डाखरोस एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन हेमंत पारेख प्रेझेंट लेजेंड गायक मुकेश यांच्या लोकप्रिय गीतांच्या " ये मेरा दिवानापन " या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन  करण्यात आले होते.  निर्माते मिलन जैन , यांच्या आॅनलाईन कार्यक्रमात वादक मिलन जैन , मिलिंद सांळुखे , अरूण गायकवाड , संकेत गोस्वामी यांच्या संगीत साथीने आरती वारा , समीर शेरला आणि हेमंत पारेख या गायकांनी मधुर , अविस्मरणीय गीते सादर केली . या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन प्रशांत राव यांनी केले.साऊंड इंजिनिअर स्वप्निल पालशेतकर आणि व्हिडिओ आॅपरेटर नरसिंहा सनाराम यांच्या सहकार्याने सादर केलेल्या या यशस्वी संगीत मैफलीला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . तसेच या कार्यक्रमाचा असंख्य रसिकांनी हेमंत पारेख यांच्या फेसबुक पेज वरून आणि यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला .  हेमंत पारेख यांनी अशा अविस्मरणीय सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमाचे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आयोजन केल्यामुळे संगीत प्रेमी रसिकांना घरबसल्या आनंद मिळाला.या पुढेही असा सुरेल संगीताचा नजराणा देण्यासाठी हेमंत पारेख प्रयत्न करणार आहेत.

No comments:

Post a comment