तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 5 July 2020

मंगरुळपीर येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक ऊपक्रम राबवणार्‍या कर्तुत्वान महिलांचा सत्कार




पुरोगामी पञकार संघनेचा पुढाकार

जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांच्या प्रमुखहस्ते सन्मानपञ वितरण

मंगरूळपीर-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक दायित्व निभावून कार्य करणार्‍या कर्तुत्ववान आशा वर्कर्स आणी बचतगटातील सामाजिक ऊपक्रम राबवनार्‍या महिलांचा महाराष्ट पुरोगामी पञकार संघाकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे हस्ते वितरीत करन्यात आहे.
           सध्या कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे.संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस ,डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. याच उदात्त भावनेतून मंगरुळपीर येथील स्वयंसेवी आणी सामाजीक कार्यकर्त्यांचेही कार्य ऊल्लेखनिय आहे.या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात आणी वाशिम जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे ऊपस्थीतीत मंगरुळपीर तालुक्यातील आशा वर्कर्स आणी बचतगटातील महिलांचा 'कोरोना योध्दा'सन्मानपञ देवुन सत्कार करन्यात आला.विशाखा भालेराव यांनी कार्यक्रम नियोजनासाठी रोख स्वरुपात मदत केली.यावेळी पञकार रमेश मुंजे,कविता भगत,करुणा अ.भगत,संगिता गजभार,जयश्री शिंदे,शालुताई आडोळे,वेणुताई अंजनकर,कविता भि.भगत,मंगला भोडणे,राजकन्या मनवर,पुष्पा देवकर,किरण खिराडे,अंकिता मनवर,साक्षी भगत आदींची ऊपस्थीती होती.सदर कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन घेन्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment