तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 July 2020

औंढा नागनाथ येथील इतिहासात पहिल्यांदाच शिवमंदिर परिसरात शुकशुकाट

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली : आजचा दिवस हा अत्यन्त महत्वाचा आहे. कारण श्रावणातला पहिला सोमवार आज आहे.प्रभू शंकराच दर्शन घेण्याकरिता दरवर्षी श्रावणनी सोमर निमित्त देश भरातील शिव मंदिरावर भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळते,मात्र यावर्षी कोरोना मुळे लॉकडाउन असल्याने सर्व शिव मंदिर बंद आहेत. त्यामुळे भाविकांना शिव प्रभूच दर्शन यावर्षी घेता येणार नाहीये, त्यामुळे सर्व शिव मंदिरात ओस पडल्याच चित्र बघायला मिळते.बारा जोतिर्लिंग पैकी एक असलेले मराठवाड्यातील औंढा नागनाथ येथील आठवे जोतिर्लिंग श्री. नागेश दारुकावणे मंदिर देखील भाविकावीना ओस पडलं आहे. आज सकाळी सहा वाजता तहसीलदार यांचे हस्ते शासकीय पूजा पार पडली,शिव प्रभूला पिंडीवर दुग्ध अभिषेक घालण्यात आला.यावर्षी श्रावण महिन्यात मंदिर बंद राहणार असल्याने 1 कोटी रुपयाचे वर देणगी रुपी मिळणारे यावर्षी मिळणार नाहीये. त्यामुळे मंदिर समिती बरोबरच मिठाई व इतर व्यवसाय देखील मोठा फटका बसला आहे.कोरोनाच देशावरील हे संकट लवकर दूर होवो ! हिच प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे. आज श्रावण सोमवार निमित्त शिवप्रभू ला देखील आपण हेच साकडे घालू यात. 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment