तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 July 2020

रोजगार हमी योजनेच्या कामापासून बीड जिल्ह्यातील अपंग वंचित आपंगावर आली उपासमारीची वेळ योजनेमध्ये काम देण्याची ------ रघुनाथ तोंडे यांची मागणी               (किल्ले धारूर प्रतीनीधी) रोजगार हमी योजनेमध्ये आपंग बांधवांना काम द्यावे असे आदेश अपंग आयुक्त यांनी काढले आहे त्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगार अपंगांना फक्त जॉब कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली असुन अपंगांना फक्त जॉब कार्ड देण्यात आले असुन त्यांना काम मीळत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी केला आहे कोणाच्या संकट काळात आपंगांनवर उपास मारीची वेळ आली आसुन अपंगांना रोजगार मिळणे बाबत त्वरित स्वतंत्र आराखडा तयार करून रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी केली आहे कोरोणा या महामारी मुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे देशातील सर्व सामान्य जनता हतबल झाली आहे प्रत्येकाचा रोजगार हिरावला गेला असुन जिवन जगणे देखील असाह्य झाले आहे कोरोणा काळात अपंगांना काम नाही त्यांच्यावर उपचार मातीची वेळ आलेली आहे शाशन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे सध्या दिसत आहे जॉब कार्ड मिळाले नंतर अपंग व्यक्ती समंधीत ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेले असता अपंगांना कोणते काम द्यावे अशा सुचेना आम्हाला नसल्याने आम्ही तुम्हाला काम देऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे अपंग बांधवांमध्ये या शासनाच्या या धोरणात विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे जिल्हा रोजगार योजनेने अपंगांना रोजगार मिळणे बाबत त्वरित स्वतंत्र आराखडा तयार करून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असी प्रहार संघटनेच्या वतीने रघुनाथ तोंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment