तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंद चौरे यांच्या वतीने सिद्धार्थ नगर येथे निर्जंतुकीकरण फवारणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री मा.पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात आणि समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे. परळीतही वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होत असून सिद्धार्थ नगर येथे भाजयुमो चे गोविंद चौरे यांनी अनोखा उपक्रम राबवला.
     मागील काही दिवसांपासून परळी शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग चांगलाच वाढत आहे त्यात सिध्दार्थ नगर येथे देखील ४ रुग्ण आढळून आले होते तेव्हा पासून सिद्धार्थ नगर कंटेंटमेंट झोन घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून आज संपूर्ण सिद्धार्थ नगर निर्जंतुकीकरण फवारणी करून अनोखा उपक्रम राबवून लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे यांना शुभेच्छा दिल्या.
     सिद्धार्थ नगर येथे  नागरिकांचे घरं तसेच परिसर निर्जंतुकिकरण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
         यावेळी भाजपा अनु.मोर्चा चे प्रदेश नेते सुभाष सावंत,भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अरुण पाठक,भाजयुमो शहर संघटक योगेश पांडकर,नितीन मुंडे व सिद्धार्थ नगर येथील रतन उजगरे,गोपाळ थोरात,भैया तरकसे उपस्थित होते.

No comments:

Post a comment