तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

शासनाने खाद्य खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकरी बांधवांना , शेतकरी  बळीराजाला शासनाने खाद्य खतांचे दर कमी करून दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलणे आवश्यक आहे . कारण सध्याची परिस्थिती शेतीला सगळ्यात जास्त  मारक आहे. तसेच शेतमाल बाजार भावाची अवस्था अत्यंत वाईट आहे . पुढील येत्या काळातही शेतमाल बाजार भावाची परिस्थिती बरेच दिवस अशीच रहाण्याची शक्यता आहे.   शेतकरी बांधवांनी ऋषी तज्ञांच्या सल्ल्यानेच कुठलीही अतीमहागडे औषधे, लिक्विड खाद्य, किंवा इतर रसायनांचा वापर वारेमाप न करता गरज असेल तरच वापर करावा ,अन्यथा कमीत कमी भांडवली गुंतवणूक करून शेती करावी . शेण आणि गोमूत्र गुळ दाळ ह्याचे जीवामृत तयार करून जमिनीची गुणवत्ता वाढवावी ‌. त्यामुळे हमखास उत्पादन वाढते.अती महागडी किटकनाशक न वापरता ज्यांनी रोग जातो अशीही स्वस्तात बरीच किटकनाशक आहेत त्याचा निंबोळी अर्का सोबत वापर केल्यास चांगला फायदा होईल.शैतात चुकीची औषध फवारणी करू नये. कष्टाने कमावलेले थोडेफार आर्थिक भाग भांडवल आहे ते जपून शेतीसाठी वापरावे , कारण  कोरोना महामारीचे संकट आल्यावर लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही ऋषी उत्पादन कंपनीने त्यांच्या उत्पादनाचे दर कमी केलेले नाहीत. शासनाने  खाद्य , खतांच्या किमती कमी केलेल्या नाहीत, शेतात काम करण्यासाठी मजुरीचे दरही वाढले आहेत. फक्त शेतमालाचे दर ७५ %ने कमी झालेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी ही थोडे शहाणे व्हावे आणि काही काळासाठी झिरो बजेट शेती करायला सुरवात करावी. तसेच बोगस बियाणे देऊन शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या बियाणे विक्रेत्यांवर शासनाने कडक कारवाई करावी .

No comments:

Post a comment