तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 5 July 2020

परळीत युरीया खताची कृत्रिम टंचाई, दुसरा खत घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव, कारवाई करण्याची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्टिंग ऑपरेशन करूनही परळी शहरात युरीया खताची कृत्रिम टंचाई केली असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुकानदार न विकला जाणारा खत घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ कराड यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांनी दुकानदारांचे साठे तपासावेत अशीही मागणी केली जात आहे.
      अगोदरच सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. दुबार पेरणी करूनही सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे युरीया खताची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन करून खताची लपवा छपवी उघड केली होती. मात्र तरीही दुकानदार शेतकऱ्यांना त्रास देण्याचे थांबवत नाहीत. सध्या सर्व प्रकारच्या खताची मुबलक उपलब्धता असली तरी युरीया खताची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई केली जात आहे. बाजारात सध्या युरीया उपलब्ध नसल्याचे सांगून न विकला जाणारा खत शेतकऱ्यांना घेण्यास भाग पाडले जात असल्याचे इंजेगावचे शेतकरी वैजनाथ कराड यांनी सांगितले.
      शासनाने शेतकऱ्यांना आवश्यक तो खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला असला तरी व्यापारी युरीयाची कृत्रिम टंचाई करून साठेबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी व्यापार्‍यांचे साठे तपासुन शेतकऱ्यांना युरीया उपलब्ध करून द्यावा आणि साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यावर कारवाई करावी अशी मागणीही वैजनाथ कराड यांनी केली आहे.

No comments:

Post a comment