तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

" आशियाई स्पर्धेत हिमा दास, मोहम्मद अनस , राजीव अरोकिया , एम आर पुवम्मा या खेळाडूंना सुवर्णपदक "


जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळांमध्ये ४ बाय ४०० मिश्र रिले प्रकारात भारतीय संघातील चार खेळाडू हिमा दास , मोहम्मद अनस, राजीव अरोकिया , एम आर पुवम्मा यांना रौप्य पदक मिळाले होते. परंतु आता अचानक एक आनंदाची बातमी देणारी घटना घडली. याचे कारण त्या स्पर्धेतल्या बहरीनचा केमी अदेकोया हा सुवर्ण पदक मिळवणारा खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणी मध्ये दोषी आढळला. त्यामुळे त्याच्या बहरीन संघावर एआययू ने कारवाई केली आणि पुर्वी भारतीय संघाला मिळालेल्या रौप्यपदका ऐवजी सुवर्ण पदक प्रदान केले. विशेषतः भारतीय खेळाडू हिमा दास हिने जगातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत देश जात असताना सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या या आनंददायी घटनेने प्रेरीत होऊन ते सुवर्ण पदक कोरोना योध्द्यांना दान केले. जगभरातील क्रिडा प्रेमींनी हिमा दासच्या या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीचे आणि भारतीय खेळाडूंना मिळालेल्या अभुतपुर्व यशाचं कौतुक केले आहे . या सर्व सुवर्णपदक विजेत्या भारतीय खेळाडूंना मानाचा मुजरा !

No comments:

Post a comment