तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

परळीतील नागापूर येथील वाण धरणाची पाणीपातळी दिड फुटाने वाढलीपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
परळी शहरासह 15 गावांना पाणी पुरवठा करणार्या वाण प्रकल्पात यावर्षीच्या पावसाळ्यात मागील महिनाभरात दिड फुटाने पाणीपातळी वाढली असुन तीन वर्षानंतर यावर्षी हे धरण पुर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे.
परळी शहरासह तालुक्यातील 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या व 19.7071द.ल.घ.मी क्षमता असलेल्या नागापुर येथील वाण प्रकल्पात उन्हाळाअखेर 30 मे रोजी 5.1797 द.ल.घ.मी. म्हणजेच 26% पाणीसाठा शिल्लक होता.अंबाजोगाई,धारुर या वाण प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात दि.1 जुन पासुन मान्सूनपूर्व व मान्सुनचा समाधानकारक पाऊस झाल्याने मागील एक महिन्यात धरणाची पाणीपातळी दिड फुटाने वाढत पाणीसाठा 6.3618 द.ल.घ.मी.एवढा झाला आहे तर एकुण पाणीसाठ्यात 6% वाढ होवुन 32% पाणीसाठा झाला आहे.यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने 2016 साली पुर्ण क्षमतेने भरलेला हा प्रकल्प तीन वर्षानंतर ओसंडुन वाहण्याची आशा आहे.

No comments:

Post a comment