तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

धर्मांतराची सक्ती करणाऱ्या पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलिसात

 गुन्हा दाखल जिंतूर :-दि.23 -शहरासह ग्रामीण भागात अशिक्षित नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून सक्तीने धर्मांतर करणाऱ्या दोन महिलांसह तीन जना विरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.       याबाबत माहिती अशी की, तालुक्यात अशिक्षित लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना  ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाढण्याचा प्रकार यापूर्वी उघड झाला.  शहरातील काही भागात एखाद्याच्या घरात एकत्रित येऊन त्यांना  ख्रिश्चन धर्माचे महत्त्व पटवून दिले जाते.येशूची आराधना केल्यास घरात सुख, शांती समृद्धी  प्राप्ती होते अशी बतावणी करून नागरिकांना जबरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. मागील दहा दिवसापूर्वी तालुक्यातील इटोली गावानजीक साईनगर तांडा येथे सक्तीने धर्मांतराचा प्रकार चालू होता परंतु गावातील काही सुजाण नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला .तालुक्यात भोगाव,खददडी,गणेश नगर तांडा ,सावळी बुद्रुक ,येलदरी या गावासह अनेक गावात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी टोळीच कार्यरत आहे. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी या लोकांना 30 ते 40 हजार रुपये दरमहा वेतन दिल्या जात असल्याचीही माहिती आहे. ज्या नागरिकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशा लोकांना चार ते पाच लाख रुपयाचे आमिष दिले जात असल्याचीही चर्चा आहे.
          अज्ञानी व अडचणीत सापडलेल्या व अपंग लोकांना एकत्रित करून त्यांना ख्रिश्चन धर्माचे महत्त्व पटवून दिले जाते. लोकांनी आपल्या घरातील हिंदू देव-देवतांचे फोटो काढून घरात येशूचा फोटो लावून यशुची आराधना करण्याचा सल्ला दिला जातो. ख्रिश्चन धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचा  प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना आल्याने  तालुक्यातील लिंबाळा येथे एका घरात मागील अनेक दिवसापासून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याची माहिती दिली.  पोलीस निरीक्षक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना लिंबाळा येथे या प्रकाराचा तपास करण्यासाठी  कर्मचाऱ्यांना  पाठविले.  मागील अनेक दिवसांपासून  विलास शिंदे यांच्या घरात ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली या माहितीवरुन पोलिसांनी विलास लक्ष्मण शिंदे यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दोन महिला व इतर पाच जण आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांनी मुलांच्या लग्नाच्या संबंधासाठी आल्याची बतावणी  पोलिसांना केली. परंतु याठिकाणी धर्माचा प्रसार होत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
        जास्त संख्येने एकत्रित करण्याचे आदेश नस्तानाही मोठ्या संख्येने एकत्र येऊन नियमाचे उल्लंघन केल्यावरून पोलिसांनी अंजली उर्फ पिंकी ताई रमेश उर्फ संजय चव्हाण रा. आमदार कॉलनी जिंतूर, नितीन गिरधारी चव्हाण ,गोपाल राघोजी चव्हाण रा. जिंतूर विलास किसनराव शिंदे , वंदना विलास शिंदे रा. लिंबाळा या पाच जणांविरुद्ध 188 ,269, 270 भा. द.वि.कलम 51प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a comment