तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

मनसे चा प्रशासनाला ईशारा दुधदर वाढ करा अन्यथा ग्रामिण भागातील दुध शहरात येऊ दिले जाणार नाही
आकाश लश्करे
उस्मानाबाद


उस्मानाबाद-कोरोणा संकटात अनेक निर्बंधामुळे दुधाची मागणी कमी झाली असून शेतकऱ्यांना अल्प दर मिळत आहे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने दुधाला लीटरमागे दहा रुपये वाढ करण्यात यावी तसेच दुधाच्या अनुदानावरील जीएसटी रद्द करावी, दूध पावडर आयात रद्द करावी, प्रति किलो दूध पडला 50 रुपये अनुदान देण्यात यावे,असे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २३-७-२०२० रोजी देण्यात आले भाववाढ न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,येत्या सहा ऑगस्ट पासून "दुध बंदी"करण्यात येईल,तसेच ग्रामीण भागातील दूध शहरात येऊ दिले जाणार नाही शहराच्या वेशीवरच दूधच्या गाड्या आडविल्या जातील याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे,यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे, जिल्हा मिलिंद चांडगे, शहराध्यक्ष संजय पवार, सरपंच मुरली देशमुख,विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख, आदी पदाधिकारी उपस्थित..

No comments:

Post a comment