तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 4 July 2020

पाथरी तालुक्यात शेत मशागतीच्या कामांना वेग.


प्रतिनिधी
पाथरी:-गेली पाच-सहा वर्षातील कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मृगात दमदार सरीं तालुक्यात सर्वदूर बरसल्याने खरीपाची पेरणी वेळेत पुर्ण झाली.सोयाबीन बियाणे निकृष्ठ निघाल्याने अनेक शेतकरी पर्यायी पिकाच्या पेरणीत व्यस्त असले तरी मुग,उडीद, कापूस, तुर, तीळ,ऊस या पिकांत आंतरमशागत करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र गावशिवारात दिसून येत आहे.
मृग नक्षत्र निघण्या आधी पासूनच पाथरी तालुक्यात वरूणराजाने सर्वदूर हजेरी लावली. मृग नक्षत्रात ही सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झाल्याने गावशिवारात पेरण्यांची लगबग दिसून आली. या कालावधीत पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने सोयाबीन वगळता सर्व पिके तनातून मुक्त करण्या साठी कोळपणी,खुरपणी, खत घालण्याच्या कामांनी वेग घेतला आहे. युरीया खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी चिंतेत आहेत. पिकांच्या वाढी साठी युरीया खतांची मात्रा मिश्रखतां बरोबर दिली जाते. या खतांची टंचाई दाखवली जात असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. काही कंपन्यांचे सोयाबीन बियाने ऊगवले नाही तर काही घरगुती बियाने ही ऊगवले नाही असे शेतकरी नविन बियानांची उपलब्धता करून पेरणी साठी धावपळ करतांना दिसून येत आहेत. तर काही जन पहिलीच पेरणी उधार उसनवारी सह सावकाराचे कर्ज काढून केलेली असल्याने आता बियाणे कसे आणि कोणते पेरावे या चिंतेत आहेत. पाथरी तालुक्यात १ जुलै ते पाच जुलै पर्यंत वार्षिक सरासरीच्या १६१.३९टक्के पाऊस पडणे अपेक्षित असतांना. पाथरी सह बाभळगाव आणि हादगाव मंडळात आज पर्यंत २६२.३३ म्हणजेच सरासरीच्या १६२.५ टक्के पाऊस झाला असल्याने उगवन झालेल्या पिकांची अवस्था चांगली दिसू लागली आहे. आता या पिकांना तनमुक्त ठेवण्या साठी सकाळ पासूनच गावकुसात लगबग चालली आहे.एकाच वेळी शेतीची कामे आल्याने मजूरीचे दर ही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. खुरपणी साठी महिला मजूर दोनशे तर पुरूष अडीचशे ते तीनशे रुपये मजूरी घेत असल्याचे सांगितले जात आहे. गेली पाच सहा वर्षात प्रथमच महिना भरापासून तालुक्यात सर्वत्र पडणा-या पावसा मुळे शेतशिवार हिरवाईच्या शालूने नटलेले दिसत असून या शेतातील आंतरमशागतींच्या कामां मुळे गावात केवळ म्हातारी मंडळीच दिसत आहेत.

No comments:

Post a comment