तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

महाराष्ट्रातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे दोन महिन्याचे मानधन एकत्रितपणे अदा


- सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांची माहिती 

महाराष्ट्र  राज्यातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा  अदा करण्यात येणाऱ्या  मानधनापैकी  मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात येत असून येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे सांस्कतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

   राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना १९५५ - ५६ पासून  अ, ब व क  या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर,  उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे अदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठीशी यापुढेही समर्थपणे उभा राहील असेही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी कलावंत आणि साहित्यिकांना आश्वस्त केले आहे.

No comments:

Post a comment