तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 3 July 2020

केज तालुक्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड


केज (प्रतिनिधी) :- 
       तालुक्यातील आरणगाव येथिल प्रगतिशील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. 

केज तालुक्यातील आरणगाव येथील प्रगतशील आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी रमेश सिरसाट यांनी मस्साजोग ते उत्तरेश्वर पिंप्रीकडे जाणाऱ्या राज्य रस्त्या लगतच्या आपल्या फार्म हाऊसच्या परिसरात दहा गुंठे क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. 

शेतकर्‍यांना कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारे व महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत चांगल्या प्रकारे येणारे एकमेव फळ ड्रॅगन फ्रुट आहे. ड्रॅगन फ्रूट हे व्हिएतनाम या देशाने अतीशय कमी पाणी व कमी कालावधीत येणारी जात विकसीत केलेली आहे. 

रमेश सिरसाट यांनी आपल्या दहा गुंठे क्षेत्रात एका सिमेंटच्या पोलच्या पायथ्याशी याची लागवड केलेली आहे. ह ड्रॅगन फ्रुट हे लागवड केल्यापासुन ११ ते १२ महिन्यात फुले लागण्यास सुरवात होते. फुले लागल्या पासुन ३० ते ३५  दिवसात ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी तयार होते. याच्या फळांचे वजन ४०० ते ९०० ग्रॅम असते. पहिल्या वर्षी एका झाडाला ते १० ते १५ किलो ग्रॅम माल निघतो. त्या नंतर पुढे प्रत्येक झाडाला ४० ते ५० किलो ग्रॅम माल निघतो. या फळाला चांगला बाजारभाव आहे. प्रति किलो ग्रॅम २०० रु. ते ३०० रु. असा बाजार भाव मिळतो. रमेश सिरसाट यांच्या ड्रॅगन फ्रुटला फुले लागायला सुरुवात झाली आहे. 

या ड्रॅगन फ्रुटच्या बागेला मस्साजोग कृषि मंडळ कार्यालयाचे मंडळ कृषि अधिकारी अधिकारी विकास अंबोरे,  समूह सहाय्यक कमलाकर राऊत, कृषि सहाय्यक किशोर फरकांडे पत्रकार गौतम बचुुुटे यांनी भेट देऊन पहाणी केली. रमेश सिरसाट यांनी केज सारख्या दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुटची लागवड करून शेतीत वेगळा प्रयोग केला आहे.

चौकट :- 
--------------------------------------

" मी ड्रॅगन फ्रुटची अवघ्या दहा गुंठ्यांत प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. याचे उत्पन्न आणि पिकाचा अनुभव आल्यास मी जास्त क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड करणारा आहे. शेतकऱ्याने पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी. "
         ---- रमेश सिरसाट,
उद्यान पंडित शेतकरी, आरणगाव ता. केज

No comments:

Post a comment