तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

गंगाखेडची प्रसिद्ध हरंगूळ यात्रा रद्द


गंगाखेड (प्रतिनिधी) :- 
गंगाखेड तालुक्यातील मौजे हरंगूळ येथील राजा भर्तृहरीनाथ यात्रा दि.२५ जुलै रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे.
नावनाथाची नऊ तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रापैकी एक श्रीक्षेत्र हरंगूळ आहे. नागपंचमीच्या दिवशी राजा भर्तृहरीनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून एका लाखापेक्षा जास्त भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून श्रीक्षेत्र प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले राजा भर्तृहरीनाथ आहे. मावळ प्रांताची(मध्यप्रदेश)ची राजधानी उजैनचा राजा भर्तृहरी हे राजा विक्रमादित्याचे थोरले भाऊ होते. लहान भावाच्या योग्यतेबद्दल पूर्ण विश्वास ठेऊन राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले. राजा भर्तृहरी याचा नितीशतक हा ग्रंथ जगात सर्व नितीविषयक ग्रंथात सर्व श्रेष्ठ मानला जातो. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या कथा या देशभरात प्रसिद्ध आहेत. दि.२५ जुलै रोजी होणारी यात्रा अखेर कोरोनाच्या संकटात रद्द करण्यात आली आहे. या एकवताच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात पण हि यात्रा कोरोनामुळे रद्द झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड व टी.टी.शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a comment