तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 4 July 2020

गावठी पिस्तूलासह दोघांना पोलिसांनी पकडले! परळीतील अग्रवाल लाॅजजवळ एलसीबी पथकाची कारवाई


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसासह एलसीबीच्या पथकाने भरदिवसा दोघांना ताब्यात घेतले. ही खळबळजनक घटना अग्रवाल लाॅजजवळ घडल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील अग्रवाल लाॅजजवळ दोघेजण गावठी पिस्तूल आणि काडतुसासह असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने धाडसी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, जमादार भास्कर केंद्रे, मुंजा कुंवारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, रामदास तांदळे, चालक अतुल हराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
      एलसीबीच्या पथकाने ज्ञानोबा मारोती गित्ते (गोट्या), आनंद जय अग्रवाल या दोघांना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरीकांतुन समाधान व्यक्त केले आहे

No comments:

Post a comment