तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

वृक्ष लागवडी जन्मभूमी फाऊंडेशनला फळ झाडांची भेट


प्रतिनिधी
पाथरी:-येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक दिपकराव गवारे यांनी कृषी दिना निमित्त जन्मभूमी फाऊंडेशन ला वृक्ष लागवडी साठी बुधवार १ जुलै रोजी पंधरा फळ झाडे भेट दिली.

प्रती वर्षी जन्मभूमी फाऊंडेशन वक्षांची लागवड करून त्याचे योग्य संगोपन करत झाडे जगवत आहे. या वर्षी जमेल तेवढी फळ झाडांची लागवड करून त्याचे संगोपण करण्याचा मानस जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिवराव थोरात आणि पदाधिका-यांनी केला असल्याने समाजातील वृक्ष प्रेमी नागरीकां कडून विविध फळांची झाडे मिळऊन वाघाळा येथे जन्मभूमी फाऊंडेशन ने उभारलेल्या बंधा-यावर या फळ झाडांची लागवड करणार  असल्याची माहिती थोरात यांनी दिली. त्या अनुशंगाने बुधवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक दिपकराव गवारे यांनी नारळ,केसर आंबा,जांब  असे प्रत्येकी पाच झाडे कृषी दिनाचे औचित्य साधून जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांच्या कडे सुपुर्द केले.

No comments:

Post a comment