तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन'तुम्ही, जरी पोहोचत नसला तरी तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचत आहेत'

मुंबई (प्रतिनिधी) :- दि २५ ----- तुम्ही जरी माझ्या पर्यंत पोहोचत नसलात तरी तुमच्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहोचत आहेत. कृपया आपापल्या घरूनच आपण मला आशीर्वाद आणि  शुभेच्छा द्याव्यात, माझ्यासाठी तीच फार मोठी ताकद आहे असा संदेश पंकजाताई मुंडे यांनी फेसबुकवर एका  व्हिडिओ द्वारे कार्यकर्त्यांना दिला आहे.

  पंकजाताई मुंडे यांचा उद्या २६ जूलै रोजी वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या वाढदिवस साजरा करणार नाहीत. यासंदर्भात फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

  ताई, २६ जूलैला वाढदिवसाला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात,  कुठे येऊ, कधी येऊ, कशी भेट होईल, असे मेसेज सुरू झाले आहेत. माझी नम्र विनंती आहे, मुळात वाढदिवस साजरा करणं मला आवडत नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी राजकीय जीवनात एखाद दोन वर्षे मी तो प्रयोगही करून पाहिला. पण आज कोरोनाच्या या परिस्थितीत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या शुभेच्छा मनापासून निघाल्या तर त्या माझ्यापर्यंत पोचतील. आपण कुठूनही निघू नये आणि मला मुंबईपर्यंत  भेटण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये, आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, सर्व नियम पाळावे हीच माझ्यासाठी फार मोठी भेट आहे. मुंडे साहेबांचे एक वाक्य नेहमी असायचं, ' मी जरी तुमच्यापर्यंत पोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देऊ इच्छिणा-या माझ्या सर्व त्या मोठ्या परिवारातील सदस्यांना, माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या परिवाराला सर्वाना हिच विनंती आहे,तुम्ही जरी माझ्यापर्यंत पोहोचत नसला तरी तुमच्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहोचत आहेत. कृपया आपापल्या घरून आपण मला शुभेच्छा, आशीर्वाद द्याव्यात. माझ्यासाठी तीच फार मोठी ताकद आहे. कोणीही मला भेटायला येऊन स्वतःच आरोग्य धोक्यात घालू नये एवढीच विनंती आहे असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment