तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

विजेचा भरमसाठ बिलांचा प्रश्न सोडवा,वाढीव वीज दर रद्द करा विज कनेक्शन तोडून नका,-अन्यथा"खळखट्याक" आंदोलन करण्यात येईल-मनसे
आकाश लश्करे
उस्मानाबाद

उस्मानाबाद-जिल्हात महावितरण कंपनीने 3 महिन्याचे विजबिलाचा जबरदस्त शॉक दिला आहे जुन महिन्यांची जी बिले  ग्राहकांना पाठविले गेलीआहेत ति शब्दश सामान्य सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारे आहेत मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या सरासरी विजबिल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यात विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेचे बिल ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकाच्या माथी मारण्यात येत आहे तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेलेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लुटच म्हणावी लागेल त्यात टाळेबंदीमुळे व्यवसायिक आस्थापनं देखील तीन महिने बंद होते तरीही त्यांना सरासरी वीज बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेलेले आहेत टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नौकर कपात सुरू केली आहे अशा वेळेस राज्य सरकारने सहोलत देण्याची सोडून नागरिकांच्या खिशावर दरोडा घातला आहे त्या मुळे आज २९जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालयात जाऊन अधिक्षक अभियंता एस.बी.पाटिल यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर वाढीव विजदर रद्द करण्यात यावा व ग्राहकांना सवलत देण्यात यावी व विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला लगेच निवेदनाची दखल घेत अधिक्षक अभियंता श्री एस.बी.पाटिलसाहेब यांनी ग्राहकांचे विज कनेक्शन तोडण्यात येणार नाही असे आश्र्वासन दिले यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे, शहर अध्यक्ष, संजय पवार, विद्यार्थ्यी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल महाजन, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख,धिरज खोत, पृथ्वीराज शिंदे,सुरज कांबळे,अदी पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a comment