तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 July 2020

" मा.मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदासाठी शिफारस "


(अनुज केसरकर)
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार पदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पुण्यातील ३० कला सांस्कृतिक संस्थानी शिफारस करुन पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केली .  त्याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे कार्यवाह प्रमोद दादा रणवरे , सदस्य व लोकधारा निर्माते नितीन मोरे , आम्ही एक पात्री चे संतोष चोरडिया , संभाजी ब्रिगेड चित्रपट सेनेचे अध्यक्ष प्रकाश थांबले , अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल अण्णा गुंजाळ , आणि नाट्य परिषदेच्या संचालिका शोभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सर्व उपस्थित कलाकार तंत्रज्ञ यांनी मा.मेघराज राजेभोसले यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी पाठिंबा दिला .

No comments:

Post a comment