तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 1 July 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने अतिवृष्टी नुकसानीचा २० कोटी ७५ लाखाचा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी प्राप्तहिंगोली :प्रतिनिधी 

  हिंगोली जिल्ह्यासाठी अतिवृष्टी दुष्काळी अनुदान प्राप्त झाले नव्हते, ही बाब खासदार हेमंत  पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून  पत्राद्वारे मागणी  करत  शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्या मागणीला यश आले आहे. त्यामुळेच  प्रलंबित  अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून तब्बल २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून संबंधित तालुक्याच्या सर्व तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे  .यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे .
              मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात हिंगोली जिल्हयात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास  निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावल्या गेला. यामुळे शेतकरी हवालदिल झाले  होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी थेट  शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून खासदार हेमंत पाटील  यांनी संसदेच्या  हिवाळी अधिवेशनात याबाबत हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी करत आवाज बुलंद केला होता परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, ही बाब खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी खंबीर भूमिका घेत पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत पत्रव्यवहार करून मागणीला जोर देऊन प्रलंबित  असलेले अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी केली होती. या या बाबीची केंद्र व राज्य सरकारने दखल घेत कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यासाठी हिंगोली जिल्हयाला २० कोटी ७५  लाखाचे अनुदान मंजूर  केले असून हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. लवकरच शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यात येणार आहे . हिंगोली जिल्हा आणि मतदार संघातील शेतकऱ्यांच्या  प्रश्नी खासदार हेमंत पाटील सदैव खंबीर भूमिका घेऊन ,पीकविमा ,शेतमाल  प्रक्रिया उद्योग, सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरवात, मका ,ज्वारी खरेदी केंद्र सुरवात, फेरफार नक्कलसाठी होणारी अडवणूक ,पीककर्जासाठीची होणारी अडवणूक याबाबत, सातत्याने शासन दरबारी प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे .


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment