तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

सेनगांव पोलिसांत माजी जि.प.अध्यक्षासह कुटुंबातील ४ जणावर गुन्हा दाखल


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथे कोविड १९ पाँझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या माजी जि. प. अध्यक्षासह कुंटुबातील ४ जणांनी ३ दिवस उलटून ही काँरंटाईन सेंटरमध्ये दाखल न होता आपला स्वँब तपासणीसाठी न दिल्याने सेनगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश दिगंबरराव फडसे यांच्या फिर्यादीवरून सेनगांव पोलिसात दि.२२ जुलै बुधवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगांव शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील समता नगर मधील एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात माजी जि.प.अध्यक्षासह पती,मुलगा व सुन आले होते त्यांना तालुकास्तरीय काँन्टेक्ट ट्रेसिंग टिम मार्फत तोंडी, मोबाईलव्दारे संपर्क करुन तुम्ही काँरंटाईन सेंटरमध्ये तात्काळ दाखल होऊन आपले स्वँब तपासणीसाठी द्यावे असे सांगुन ही यातील आरोपीतांनी दि.१९ जुलै ते २२ जुले पर्यंत काँरंटाईन सेंटरमध्ये दाखल न होता आपल्या घरी राहुन इतरांचे आरोग्य धोक्यात आनले व मा. जिल्हाधिकारी साहेबांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.२५१/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८,२७०,३४ व साथरोग  प्रतिबंध कायदा १८९७ कलम ४ नुसार सेनगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.दिलीप नाईक हे करीत आहेत.

No comments:

Post a comment