तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 July 2020

नेतल बंगची बारावीच्या परिक्षेत ९२% गुण मिळवुन गगनभरारी



ऊच्च पदावर आरुढ होन्याचे कुटुंबियांचे स्वप्न पुर्ण करन्याचा बांधला चंग

नेतलची बालवयापासुनच शैक्षणीक प्रगती वाखानन्याजोगी

वाशिम(फुलचंद भगत)-मंगरुळपीर येथील प्रसिध्द विधिज्ञ अॅड.प्रशांत बंग यांची कन्या नेतल बंग हिने नुकत्याच बारावीच्या लागलेल्या निकालामध्ये वाणिज्य शाखेमधुन ९२% गुण घेवुन नेञदिपक यश मिळवले आहे.
       शालेय वयापासुनच शैक्षणीक कार्यामध्ये अग्रेसर राहुन नेहमी अव्वल येणाचे स्वप्न बाळगणारी आणी नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालामध्ये एल आर टी महाविद्यालयात वाणीज्य शाखेतुन ९२% गुण मिळवुन आपल्या बुध्दीमत्तेची चुणुक दाखवलेल्या नेतलचे सर्व स्तरातुन कौतुक होत अाहे.नेतल ही मंगरुळपीर येथील प्रसिध्द विधिज्ञ अॅड.प्रशांत बंग यांची कन्या असुन ते नेहमी आपल्या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करत असतात व आपल्या मुलीने नेञदिपक यश मिळवुन ऊच्च पदावर आरुढ व्हावं हिच त्यांची मनिषा असल्याने आईवडीलांच्या स्वप्नपुर्तीसाठी नेतलने बारावीमध्ये ९२% गुण मिळवुन पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे.नेतलच्या या यशाबद्दल ती शिक्षकासह आईवडीलांचे प्रमुख योगदान असल्याचे आवर्जुन सांगत असुन तिचे कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment