तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा पीकविमा सुद्धा संबंधित बँकांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० साठी पीकविमा भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरलेला असताना ज्या गावांची नावे विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणीं आहेत. एखाद्या शेतकऱ्याचे नाव पोर्टलवर दिसत नसल्यास त्यांचा पीकविमा बँकेने ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तरी शेतकऱ्यांचा पीकविमा सुद्धा संबंधित बँकांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा व संबंधित विमा कंपनीकडे वर्ग करावा असे या आदेशात म्हटले आहे.
     
प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 चा हंगाम दि.17/07/2020 राजी पासून राबविण्यात येत आहे. सदर च्या शासन निर्णयानसार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा समिति गठीत करण्यात आलेली आहे. समिति अध्यक्ष या नात्याने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. मा.जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेश जारप्रपि.वि.यो/2994/20 दि.28/07/2020 या पत्रान्वे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 अलर्गत संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकन्यांना का , सी.एस.सी केद्रा मार्फत विमा सहभाग नौदविण्यात येतो. त्यानुसार तालुक्यातिल शेतकरी विमा सहभाग नोंदवत असतात. शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव नोंदवण्याची अंतिम तारीख 31/07/2020 अशी आहे. यासाठी कमी कालावधी राहिलेला आहे व कोणी शेतकरी पिकविमा योजने पासून वंचित राहू नयो याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी. या संदर्भात आदेश देण्यात येतो की, आपले शाखेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे व ज्यांचा 7/12, 8अ, पिकविमा भरताना पोर्टलवर सलग्न होत नाहीत अशा शेतकन्यांचा विमा प्रस्ताव आपले शाखेत स्वीकारण्यात यावा असे आदेश दिले आहेत. विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा पीकविमा सुद्धा संबंधित बँकांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment