तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

नारायणराव कुलकर्णी ( देऊळगावकर ) यांचे निधन


सेलू ( जि.परभणी ), दि.२४ ( प्रतिनिधी ) : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीचे सदस्य तथा नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नारायणराव तु. कुलकर्णी-देऊळगावकर ( वय  ८६ ) यांचे शुक्रवारी (२४ जुलै ) सकाळी साडे आठ वाजता जिंतूर कॉलनी येथील  राहत्या घरी अल्पआजाराने  निधन झाले. त्यांच्यावर तहसील रोडवरील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
त्यांच्या निधनाने नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिवारातील एक ध्येयनिष्ठ आणि समर्पित शिक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
कुलकर्णी हे मराठी आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि योग व निसर्गोपचार तज्ज्ञ होते. नूतन कन्या प्रशालेतील शिक्षक सुहास देऊळगावकर यांचे ते वडील होत.

फोटो ओळी : 
नारायणराव कुलकर्णी

पूर्ण...

No comments:

Post a comment