तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 3 July 2020

परळीत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रातीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त प्रशिक्षण संपन्न
 सिरसाळा (प्रतिनिधी) :- 
  परळी  तालुक्यातील भिलेगाव येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह व शेतीशाळा प्रशिक्षणाचे आयोजन कृषि सहायक वाय. एम. हाडबे  यांनी केले. माजी मुख्यमंत्री वसतराव ना ईक यांच्या जन्म दिनानिमत्ताने १ जुलै ते ७ जुलै हा कालावधी कृषि सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्त महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या अर्थ सहायाने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शुक्रवार दि. ३ जुलै रोजी भिलेगावं  ता. परळी येथे मंडळ कृषी अधिकारी एम. बी. कवडे पर्यवेक्षक चंद्रकांत अप्पा थोंटे समूह सहायक हनुमंत चोले , आत्म्याचे बिडगर साहेब ,मिश्रा साहेब, कृषि सहायक शिंदे मॅडम सिरसाळा , यांच्या प्रमुख उपस्थि तीत  कृषी सहा्यक वय. एम . हाडबे यांनी शेती शाळा आयोजित करून कृषी  दिन साजरा केला . शेतकर्यांनी मार्गदर्शन करताना थोंटे अप्पा यांनी शेतकरयांना सोयाबीन व तूर पिकाचं  एकात्मिक किड व्यवस्थापन व नियंत्रण या विषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना  निंबोळी अर्क कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . शेतकऱ्यांना बीज्रक्रिया आणि त्याचे महत्त्व समजावून प्रत्यक्ष विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी कश्या प्रकारे प्रयत्न करावेत याची माहिती दि ली. आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभाग आपल्या सदैव सेवेत राहील असा विश्वास दिला.  या कार्यक्रमासाठी समूह सहायक चोले , कृषि मित्र मुक्तेश्वर कडभाने यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a comment