तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 July 2020

धर्मापुरीत ग्रामस्तांची जनता कर्फ्युची मागणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी, अहमदपूर, गंगाखेड व पानगाव पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे तालुक्यातील धर्मापुरी मार्केट मध्ये सर्वात जास्त गर्दी होत आहे ही गर्दी टाळण्यासाठी जनता कर्फ्यू अत्यंत आवश्यक आहे.अस पञ परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
बीड-परभणी-लातूर जिल्हयाच्या राज्यमहामार्गावर असलेले परळी तालुक्यातील धर्मापुरी गाव आहे.धर्मापुरी गावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तहसीलदार परळी यांना पञ दिले आहे.तहसीलदार यांना दिलेल्या पञात नमुद केले आहे कि, धर्मापुरी गावाची लोकसंख्या असलेले गाव आहे.यामुळे आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो.लातुर व परळी संपुर्ण लाॕकडाउन असल्यामुळे धर्मापुरी बाजारात मोठी गर्दी होत आहे.गावात दोन बॕंक,बी-बियाणे खते,सिमेंट किराणा दुकान,शिवाय तीन बिअर बार,बिअर शाॕपी,देशी दारुचे दुकाने आहेत यामुळे प्रचंड गर्दी उद्भवत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.धर्मापुरीतील नागरिकांची गावात जनता कर्फ्युची मागणी केली आहे.

No comments:

Post a comment