तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

कृषी महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ
हरितपट्टा निर्मितीतून वृक्षवल्ली विविधतेचे संवर्धन-सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी महाविद्यालय येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी बुधवार,दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी बोलताना कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की,जैव विविधता जोपासण्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते,ज्येष्ठ प्रा.डॉ.अरुण कदम डॉ.भीमराव कांबळे, डॉ.प्रताप नाळवंडीकर,डॉ.दिपक लोखंडे,डॉ.बसलींगआप्पा कलालबंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.कृषि महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2020 या कालावधीत "कृषी संजीवनी सप्ताह" आयोजित केला असून या अंतर्गत थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.योगेश वाघमारे,डॉ.नरेंद्र कांबळे,प्रा.सुहास जाधव,प्रा.सुनिल गलांडे,डॉ.विद्या तायडे,स्वप्निल शिल्लार,इरफान सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार डॉ.नरेशकुमार जयेवार यांनी मानले.

No comments:

Post a comment