तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

" शिवसेना शाखा प्रमुख हरेश शिवलकर आणि संतोष फाऊंडेशनच्या वतीने एक हात मदतीचा "


कोरोना महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात शिवसेना प्रभाग क्रमांक १७८ चे शाखाप्रमुख हरेश शिवलकर आणि संतोष फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने मदतीचा एक हात दिला आहे . त्यांनी नाटक चित्रपट क्षेत्रातील रंगकर्मी , कलाकार , तंत्रज्ञ , बॅक स्टेज कामगार , बुकिंग क्लार्क , डोअरकिपर अशा ७००० गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले आहे . तसेच त्यांनी मुंबई , विरार , नाशिक येथील गोरगरिबांना , आणि रायगड जिल्ह्यातील वादळ ग्रस्तांना अन्नधान्य वाटप केले आहे . हरेश शिवलकर शिवसेना प्रभाग क्रमांक १७८ चे शाखाप्रमुख , आणि संतोष फाऊंडेशचे अध्यक्ष आहेत . तसेच ते चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ( कोरियोग्राफर ) आहेत . सुधा चंद्रन , किशोरी शहाणे , उपासना सिंह , रविना टंडन , आयषा जूल्खा, ऋतू शीवपुरी, अशा अनेक सिने अभिनेत्री आणि कलाकारांना त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे .  हरेश शिवलकर सांस्कृतिक कलाक्षेत्रातील असूनही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक क्षेत्रातही सातत्याने सामाजिक कार्य करीत असतात .

No comments:

Post a comment