तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 4 July 2020

मंगरुळपीर येथे सामाजिक ऊपक्रम राबवणार्‍या आशा वर्कर्स आणी कर्तुत्वान महिलांचा सत्कार




जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विशाखा भालेराव यांची रोख मदत

पुरोगामी पञकार संघनेचा पुढाकार

जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांच्या प्रमुखहस्ते सन्मानपञ वितरण

मंगरूळपीर-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक दायित्व निभावून कार्य करणार्‍या कर्तुत्ववान आशा वर्कर्स आणी बचतगटातील सामाजिक ऊपक्रम राबवनार्‍या महिलांचा महाराष्ट पुरोगामी पञकार संघाकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे हस्ते वितरीत करन्यात आले.या सन्मान कार्यक्रमासाठी लागणारे सन्मानपञ,शाल गुच्छ आणी इतर खर्चासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विशाखा प्रकाशजी भालेराव यांनी रोख मदत करुन सामाजिक दायित्व निभावले आहे.
           सध्या कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे.संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस ,डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. याच उदात्त भावनेतून मंगरुळपीर येथील स्वयंसेवी आणी सामाजीक कार्यकर्त्यांचेही कार्य ऊल्लेखनिय आहे.या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात आणी वाशिम जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे ऊपस्थीतीत मंगरुळपीर तालुक्यातील आशा वर्कर्स आणी बचतगटातील महिलांचा 'कोरोना योध्दा'सन्मानपञ देवुन सत्कार करन्यात आला.विशाखा भालेराव यांनी कार्यक्रम नियोजनासाठी रोख स्वरुपात मदत केली.यावेळी पञकार रमेश मुंजे,किरणताई इंगोले,प्रियंका आडोळे,चंदा राऊत,विद्याबाई गावंडे,नंदा सावके,यशोदा माञे,सुकेशनी सोनोने,जयमाला बेलखेडे,सुजाता कटके,माधुरी कांबळे,सविता कांबळे,रुख्मीना चव्हाण,लता इंगोले आदी महिलांची ऊपस्थीती होती.सदर कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन घेन्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment