तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

तननाशक फवारणीमुळे १५ एकर सोयाबीन जळुन गेली होती अखेर स्वाभिमानीच्या दणक्याने प्रशासन व कंपनीचे प्रतिनिधी शेतक-यांच्या बांधावर झाले हजर

बाधित शेतक-यांना ठोस नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करणार - डाॕ.ज्ञानेश्वर टाले

डोणगांव :- 2

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील शेतकरी धंनजय संपतराव देशमुख,संपतराव देवराव देशमुख यांनी आपल्या शेतात कृषिउध्योग या कंपनी चे ईमाजीथायपर  तननाशक आणून फवारणी केली होती तीन तासामध्येच सदर संपूर्ण सोयाबीन पूर्णपणे पिवळे पडून अखेर सर्वच १५ एकर सोयाबीन वाळुन गेले होते.लगेच सांयकाळी दि.१.जुलै रोजी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्याशी संपर्क साधून हा सर्व प्रकार सांगितला व त्यानंतर डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी लगेच उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करुन सर्व प्रकार सांगितला आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह संबंधित  दुकानदार व संबंधित कंपनी चे अधिकारी यांना हजर राहण्या सुचना द्यावा व संबंधित शेतक-यांच्या बांधावर जाऊन मोक्का पहाणी करावी करीता सांगितले. व शेतकरी आम्ही  स्वतः यावेळी सकाळीच सदर शेतक-यांच्या शेतावर स्वाभिमानीचा फौजफाटा डाॕ .टालेसह हजर झाला व अधिकारी यांनी तात्काळ तेथे यावे अन्यथा येथुन उठणार नाही अशी आक्रमक भुमिका घेताच संबंधित कृषि विभागाचे सर्वच अधिकारी हजर झाले.त्यांना धारेवर धरत यावेळी आपण सदर शेतक-यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करावे व तात्काळ सदर कंपनीच्या बॕचचा मालाला विक्रीस स्थगिती द्यावी व  सर्वांना घेऊन संपुर्ण नुकसानीची पाहणी केली असता ज्यामध्ये शेतकऱ्याचे १००% नुकसान झाल्याचे निदर्शनास आले त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी शेतकऱ्याला पुरेपुर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच कंपनी व दुकानदार यांना शेतकऱ्याला ठोस नुकसान भरपाई न मिळाल्यास स्वाभिमानी संपूर्ण जिल्हाभर आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असा ईशारा जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.यावेळी तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल,तालुका अध्यक्ष वि.आ.अमोल धोटे, प.स.सभापती निंबाजी पांडव,गौतम सदावर्ते,भुषण मोरे,आकाश बशिरे,निलेश सदावर्ते,वैभव पनाड,उपविभागीय कृषि अधिकारी देशमुख,तालुका कृषि अधिकारी चिंतलवाड,कृषि सहाय्यक सिरसाट,बालु आखरे, डि.एन सदार,ज्ञानेश्वर आखरे,डोळस टेलर,संतोष मेंटागळे.कंपनीचे ठोसरे.सह अन्य कर्मचारी व दुकानदार प्रतिनिधी हितेश सदावर्ते  व शेतकरी उपस्थित होते.

जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment