तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 July 2020

सेलूत यंदा ऑनलाईन गणेशोत्सव व्याख्यानमाला


व्याख्यान, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

व्याख्यानमालेचे ५९ वे वर्ष

सेलू, दि.३१ ( प्रतिनिधी ) : कोविड-१९ मुळे यावर्षी येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेचे
२८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती चिटणीस गिरीश लोडाया यांनी दिली.

चार दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचे हे ५९ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन व्हावे, या हेतूने दरवर्षी व्याख्यानमालेत परिसंवाद, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

व्याख्यानमालेत खंड पडू नये या करिता व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित करण्याबाबत बुधवारी (२९ जुलै ) प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली
पदाधिकारी व निवडक सदस्यांची बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दोन व्याख्याने, एक परिसंवाद व स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम अशी चार पुष्प आयोजित करण्याचे ठरले. प्रामुख्याने कोविड-१९, लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्ष, ऑनलाइन शिक्षण-मुलांचे भविष्य आदी विषयांचा व्याख्यानमालेत समावेश असेल.

ऑनलाइन व्याख्यानमालेचे संयोजक म्हणून गंगाधर कान्हेकर निवड करण्यात आली, तर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, रवी मुळावेकर, संतोष कुलकर्णी, अजित मंडलिक, प्रणिता सोलापूरे हे , तर या वर्षीच्या व्याख्यानमाला कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य गतवर्षीचेच असतील.
यावेळी प्राचार्य कुलकर्णी, व्याख्यानमालेचे अध्यक्ष अनिल केंधळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व अहवाल चिटणीस गिरीश लोडाया यांनी सादर केला.अजित मंडलिक यांनी आभार मानले.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

पूर्ण...

No comments:

Post a comment