तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 July 2020

तालुक्यातील सर्व उर्वरीत कार्डधारकांना राशन वितरीत करा- डाॕ.ज्ञानेश्वर टालेराशन वाटप न करणाऱ्या दुकानाचा परवाना निलंबित करावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी  
   
बुलडाणा :- 29 (जमील पठाण )

        सध्या कोरोनाच्या साथीमुळे तालुक्यातील परीस्थीती खराब असुन  सर्वच प्रकारे व्यवसाय ठप्प आहेत,मजुरांना काम नाहीये बाहेरून शहरातुन मोठ्या प्रमाणात नागारीक गावामध्ये आलेले आहेत.ते आपला रोजगार गमावुन बसलेले आहेत.आणि हि परिस्थिती अजून किती दिवस चालेल हे हि सांगणे कठिण आहे अशा परिस्थिती मध्ये कुणीही उपाशी राहु नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य,प्राधान्य कुंटुबियाना,उर्वरीत कार्डधारकांना देखिल धान्य उपलब्ध करुन दिले आहे ते वितरीत करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे ज्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार व सर्वांच्या अडचणी पाहता बदल हि केले जात आहेत असे असतांना प्रशानाच्या चुकिच्या नियोजनामुळे सदर धान्य हे त्या कार्डधारकांना मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांकडे  खूप तक्रारी आलेल्या आहेत त्यामध्ये २७ जूलै रोजी डोणगाव येथील कार्डधारकांच्या अशाच तक्रारी प्राप्त झाल्या ज्यामध्ये डोणगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार पातुरकर यांच्याशी स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी संपर्क साधला असता दुकानदाराने आम्हाला राज्य शासनाकडून मागील दोन महिण्याचेच उर्वरीत धान्य मिळाले आहे ,या महिण्याचे चलान पास झाले नाही तरी आम्ही धान्य देऊ शकत नाही तेंव्हा लगेच त्याअनुषगांने स्वाभिमानी चे जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा गणेश बल्लाळे यांच्यासोबत फोनवर चर्चा करुन सदर बाब कळविली असाता त्यांनी तातडीने याबाबत तहसिलदार मेहकर यांना सुचना केल्या व सदर उर्वरीत कार्डधारकांना धान्य देण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षा समवेत  पदाधिकार्यांनी घेऊन तहसिलदार यांना निवेदन दिले आपण तात्काळ याबाबत कार्यवाही करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचा पविञा घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्याशी फोनवरुन चर्चा केली व तालुक्यातील सर्व एन.पी.एच.कार्ड धारकांची माहिती मागवून त्यांना लवकरात लवकर धान्य उपलब्ध करुन देण्याचे सांगितले व  तालुका अध्यक्षांसह मेहकर नायब तहसिलदार श्री  डाॕ.मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली फक्त डोणगांव येथेच अंदाजे  ५५० पर्यंत उर्वरीत कार्डधारकांना धान्य मिळत नसेल तर तालुक्यातील आकडा खुप मोठा असेल.या सर्वांनाच धान्य मिळाले पाहीजे जे दुकानदार धान्य वाटप करत नसतील त्यांचा परवाना निंलबित करावा याबाबतीत आपण जातीने लक्ष द्यावे असे सांगितले. व त्यांना निवेदन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या सोबत पक्षाचे तालुकाअध्यक्ष नितीन अग्रवाल व संघटना तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,पप्पु देशमुख,महेश देशमुख व देवेंद्र आखाडे उपस्थित होते.

No comments:

Post a comment