तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम


भाजपच्या वतीने कंटेनमेंट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझर वाटप करणार - सतीश मुंडे

शहरातील कंटेनमेंट झोन निर्जंतुकीकरण करून मास्क आणि सॅनिटाइझर वाटप - जुगलकिशोर लोहिया

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माजी मंत्री, भाजपच्या जेष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कंटेन्मेट झोनमधील गावांमध्ये सॅनिटाइझरचे वाटप करण्यात येणार असुन शहरातील कंटेनमेंट झोन निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरात सॅनिटाइझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी सांगितले.
       पंकजाताई मुंडे यांचा रविवार दिनांक 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय भाजपच्यावतीने घेण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. म्हणून जनतेच्या आरोग्यासाठी शहरातील सर्व कंटेनमेंट झोन भागामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असुन रविवारी सकाळी निर्जंतुकीकरणास सुरूवात केली जाणार आहे.
        शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटाइझर आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाला सकाळी 10 वाजता शिवाजी चौक येथुन सुरूवात केली जाणार असुन बसस्थानक, एकमिनार चौक, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टावर, गणेशपार, आंबेवेस आणि नेहरू चौक या भागात सॅनिटाइझर आणि मास्कचे वाटप केले जाणार आहे.

ग्रामीण भागात सॅनिटाइझर वाटप

        लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाइझर वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आले आहेत ते गाव कंटेनमेंट झोन म्हणुन जाहिर केले असुन अशा प्रत्येक गावात मोफत सॅनिटाइझर वाटप केले जाणार आहे. धर्मापुरी, इंजेगाव, जिरेवाडी,सिरसाळा, गोवर्धन अंतर्गत इनाम तांडा आदी गावांमध्ये सॅनिटाइझरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
      पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

No comments:

Post a comment