तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 July 2020

" आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप "


आरसीएफ निवृत कर्मचारी फोरम व रोटरी क्लब चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यामधील अंबरभुई या आदिवासी पाड्यातील कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या तेथील १२० कुटुंबियांना गहू, तांदूळ, डाळ, तेल, हळद, मिरची पावडर, साखर, चहापावडर पुडे अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दिनांक १६ जुलै रोजी वाडा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण गोंड, कुडुस येथील किरण कृषी सेवा केंद्राचे किरण पाटील व त्यांच्या मातोश्री, ग्रामसेवक श्री. जाधव सर, अरुण काठोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मानवी अंतर सांभाळून ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला.
        आरसीएफ फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील, रोटरी क्लबचे यू. एस. झा यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या उपक्रमांतर्गत अंबरभुई गावातील दोन महिला बचत गटांना कपडे शिलाई मशीनचेही वाटप करण्यात आले. कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणीच्या परिस्थितीमुळे फोरम अथवा रोटरी क्लबच्या सदस्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.
          आरसीएफ फोरम आणि रोटरी क्लब या संस्थांच्या माध्यमातून गेली आठ वर्षांपासून सामाजिक हिताच्या द्रुष्टीने आदिवासी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर कामे चालू आहेत. आजपर्यंत पाचघर, नवी दापचरी, कुळशेत, मोहबुद्रुक आदी गावांमध्ये विविध प्रकारची ग्रामविकासाची कामे झाल्याने तेथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या उपक्रमांच्या आयोजनामुळे ग्रामस्थांमध्ये संघटित व्रुत्ती वाढीस लागून त्यांच्यामधील परस्पर विश्वासही अधिक द्रुढ होण्यास मदत झाली आहे.

No comments:

Post a comment