तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 2 July 2020

पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी लिहिलेल्या ‘बारा ज्योतिर्लिंग स्थल कथा महात्म्य‘ या ग्रंथाचे प्रकाशन


परळी वैजनाथ, दि.2 (प्रतिनिधी)ः-
येथील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी लिहिलेल्या ‘बारा ज्योतिर्लिंग स्थल कथा महात्म्य‘ या ग्रंथाचे प्रकाशन गुरूवारी (ता.2) येथे करण्यात आले.
शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात दुपारी हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, नगरसेवक चंदुलाल बियाणी, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी, राकेश चांडक, संजय स्वामी, ज्येष्ठ पत्रकार राजेश साबणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सुधांशू प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. प्रास्ताविक लेखक लक्ष्मण वाकडे यांनी केले. या ग्रंथामुळे बारा ज्योतिर्लिंगाची माहिती, ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीच्या कथा, तेथील धार्मिक महत्व, उत्सव, आरती, पूजा, परिसरातील तीर्थस्थाने, निवासाची सोय, सर्वसामान्य वाचक, पर्यटक, शिवभक्तांना मिळणार आहे, हा ग्रंथ सर्वांच्या संग्रही राहील असा विश्वास यावेळी राजेश देशमुख, बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. ग्रंथ प्रकाशनास सहकार्य केल्याबद्दल प्रा.राजकुमार यल्लावाड, रमेश बुद्रे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.राजकुमार यल्लावाड यांनी तर आभार प्रदर्शन संजय स्वामी यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख, सचिन मराठे, रमेश जगताप, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, जगदीश शिंदे, अनंत कुलकर्णी, धिरज जंगले आदींनी मान्यवरांनी प्रकाशन सोहळयास शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण वाकडे यांनी लिहिलेल्या वैद्यनाथाची परळी, श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी स्थल कथा महात्म्य, शक्तिपीठे परळीची, वैद्यनाथाची परळी जात्यावरल्या ओव्यातून, श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळी आदी ग्रंथांना वाचक, शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. श्री वाकडे यांनी लिहिलेला हा बारावा ग्रंथ आहे. हा ग्रंथही वाचक, शिवभक्तांना आवडेल, त्यांच्या संग्रही राहील असे प्रकाशन संस्थेच्या वतीने सुधांशू वाकडे यांनी सांगितले.

No comments:

Post a comment