तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 July 2020

नवी मुंबईतील शिवसेना नेते नंदकुमार चव्हाण यांचे दुःखद निधननवी मुंबई महानगर पालिकेचे प्रथम नगरसेवक, नेरुळ फेज दोन मध्ये शिवसेना शाखा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून या माध्यमातून युवशक्ती संघटित करून तीला समाज हितासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रेरणा देणारे, यूथकौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेचे आधारस्तंभ नंदकुमार भगवान चव्हाण, वय वर्षे ६८, यांचे दीर्घ आजाराने नेरुळ येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.कट्टर शिवसैनिक असलेल्या नंदकुमार चव्हाण यांनी नेरुळ नगर विकसित होत असतानाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खऱ्या अर्थाने जनसामान्यात शिवसेना रुजवली आणि वाढवली. समाजहिताच्या दृष्टीने युवकांना संघटित करून गणेशोत्सवा सारखे विविध सामाजिक उपक्रम राबवून युवाशक्तीला दिशा दिली. वसाहतीत राहवयास आलेल्या व येत असलेल्या नागरिकांच्या मूलभूत गरजांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी पुर्तता केली. विशेषतः कुणाची कौटुंबिक स्तरावरील समस्या असो की शासकीय कार्यालयातील प्रश्न असो निर्भीडपणे कुठल्याही प्रकारच्या समस्येला भिडून त्यातून मार्ग काढण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे त्यांनी एक वेगळाच आदरभाव आणि दरारा वसाहतीत निर्माण केला होता. साहजिकच सर्वसामान्यांना त्यांचा आधार वाटत असे. त्यांच्या जाण्याने या परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

No comments:

Post a comment