तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

सेनगांव शहरातील व्यापारी व जनतेनीं तीन दिवसाचा स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा-संदेश देशमुख


हिंगोली/प्रतिनीधी
दि.२२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरात कोरोनाने शिरकाव केला असून ८ रुग्णांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून कोरोना बाधीत ५८ वर्षीय कापड विक्रेता व्यापा-याचा मृत्यु झाल्याने सेनगांवकर भयभीत झाले असून शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता व्यापारी व जनतेने स्वत:हुन दि.२२ जुलै बुधवार ते २४ जुलै शुक्रवार पर्यंत तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन शिवसेना हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून आता तर सेनगांव शहरात कोरोनाने शिरकाव केला असून आज पर्यंत कोरोना बाधीतांचा आकडा ९ पर्यंत गेला असुन यातील एक कोरोना बाधीत ५८ वर्षीय कापड विक्रेताचा काल दि.२१ जुलै मंगळवार रोजी मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाकडून निष्पन्न झाले असून सेनगांव शहरात भितीचे वातावरण पसरले.शहरातील व्यापारी व नागरीक यांनी कोणत्याही अफवावरुन विश्वास ठेवू नये व सर्वांनी दि.२२ जुलै व २४ जुलै शुक्रवार या तीन दिवसाचा स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा नागरीकांनी विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवावी व स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a comment