तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

मालेवाडीचा पीक विमा भरण्याचा प्रश्न सुटला गावकऱ्यांनी मानले पंकजाताईंचे आभार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  प्रधानमंत्री पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी मालेवाडी गाव दिसत नव्हते. याबाबत गावकऱ्यांनी माजी ग्रामीण विकास मंत्री व भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना माहिती दिली. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल  रेखावार यांच्याशी फोनवरून एकही गाव वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली. त्यानंतर हा प्रश्न मिटला असून गावकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
     सध्या शेतकरी पीक विमा भरण्यात व्यस्त आहेत. परंतु मालेवाडी व खामगांव ही गांवे ऑनलाईन पोर्टलवर दिसत नव्हते. त्यामुळे शेतक-यांना विमा भरण्यास अडचणी येत होत्या. ही समस्या सरपंच भुराज बदने व गावकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली. व हा प्रश्न मिटला.
     यामुळे सरपंच भुराज बदने, उपसरपंच आदिनाथ बदने, सोमनाथ पोटभरे, धोंडिबा गुट्टे, महादेव बदने, भरत  बदने, पाटलोबा बदने, भागवत  बदने, संजय  बदने, बाबासाहेब  बदने, ज्ञानेश्वर  बदने, धनंजय  बदने आदी  गामसथ व शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र  निकम व भाजपा ता. अध्यक्ष सतीश मुंडे यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment