तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 July 2020

भाजपच्या ग्रामीण उपजिल्हाध्यक्षपदी बालाजी रुद्रवार यांची वर्णी…
ताडकळस मध्ये कार्यकर्त्याकडुन जल्लोष..
ताडकळस/ प्रतिनिधी शेख शेहजाद
परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथिल तरुण तडफदार माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते बालाजी रुद्रवार यांची भाजपच्या ग्रामीण उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर होताच ताडकळस व परिसरात कार्यर्कत्यांनी एकच जल्लोष केला.
ताडकळस येथिल तरुण तडफदार सरपंच हुरहुन्नरी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते बालाजी चंद्रकांत रुद्रवार यांची भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांनी शुक्रवारी २४ रोजी दिले. भारतीय जनता पक्षाचे कार्य करण्यासाठी आपल्या वर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रुद्रवार यांच्या निवडीची घोषणा होणाच ताडकळस येथिल भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.तर बालाजी रुद्रवार यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a comment