तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 July 2020

स्वाभीमानी चर्मकार महासंघ जिल्हाउपाध्यक्ष पदी विशाल बावस्कार


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील चर्मकार समाजाचे सामाजीक युवा कार्यकर्ते विशाल बावस्कार यांची स्वाभीमानी चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण घोलप यांनी एका नियुक्त पत्रा द्वारे केली आहे सामाजीक कार्यात सदा अग्रेसर राहुन शेवटच्या घटकाला न्याय मिळवुन देणे समाजातील गरिब होतकरु शालेय विद्यार्थीना मदत असो कि वृद्ध अनाथाकडे जातीने लक्ष देऊन निस्वार्थ सेवा सामाजीक उपक्रम राबविणे सोबतच स्वाभीमानी चर्मकार महासंघ अराजकिय संघटनेचे कार्य उद्दीष्ट समाजाच्या तळा गाळातील नागरिकां पर्यत पोहचवुन संघटन मजबुत करावे अशी अपेक्षा नियुक्ती पत्रातुन व्यक्त करण्यात आली सामाजीक उपक्रम कार्याची दखल घेत स्वाभीमानी चर्मकार महासंघ जिल्हाउपाध्यक्ष पदी विशाल बावस्कार यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे श्रेय संस्थापक अध्यक्ष रविकिरण घोलप ,राष्ट्रीयसचिव गोरख ननवरे , युवा प्रदेशाध्यक्ष विकास तिखे, यांना देतात विशाल बावस्कार याची जि उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल चर्मकार समाज बांधवां कडून कौतुक होत आहे

1 comment: