तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा घेऊ नका-युवक कांग्रेस चे निवेदन
अरुणा शर्मा


पालम :- कोरोना संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा घाट केंद्र सरकारने घालू नये व  विद्यार्थ्यांच्या जिवाशी न खेळता विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेतल्या जावू नये या मागणीसाठी प्रेरणाताई वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रणितभैय्या खजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस व परभणी जिल्हा युवक कांग्रेस तर्फे दिनांक 22 जलाई रोजी पालम येथे तहसील कार्यालया मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना युवक कांग्रेस चे जिल्हा महासचिव रामप्रसाद कदम व निवेदन स्विकारताना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ज्योती चव्हाण, नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लोमटे.

No comments:

Post a comment